कोसला – भालचंद्र नेमाडे [Kosla- Bhalchandra Nemade]

Kosla
Kosla

बऱ्याच  इंग्रजी कादंबर्या, ग्रंथ वगैरे वाचल्या नंतर एकादी मराठी कादंबरी वाचावी असा विचार चालू होता, पण नक्की कोणती वाचावी हे पक्के होत नव्हते. काही वर्ष्यांपुर्वी ‘कोसला’ या कादंबरीचे अर्धवट ध्वनिमुद्रण मी ऐकले होते आणि ते खूपच भन्नाट वाटले होते म्हणून मी ;कोसला’ वाचायचे नक्की केले.

कोसालाची सुरवात खूपच मजेशीर आहे उदाहरणार्थ,वगैरे,आता हे नवीनच आणि आणि हे भलतच अश्या मस्त वाक्यांनी धमाल उडवली आहे. जर तुम्ही  पुण्यात शिकला असाल आणि तुमच्या वर्गात बाहेत गावाकडून आलेली मुले असतील तर मग हि कादंबरी तुम्हाला खूपच जवळची वाटेल. कोसला हि कथा आहे १९६० च्या पिढीतील पांडुरंग सांगवीकर या तरुणाची, हे त्याच आत्मचरित्रच आहे असा म्हटले तरी चालेल. पांडू/पंड्या हा एका खेड्यातून पुण्यामध्ये शिकायला येतो. शहरातील गोष्टी, शहरातील लोकांचे वागणे इत्यादी बद्दलचे त्याचे निरीक्षण आणि त्याचे याच्या वरचेभाष्य खूपचमजेशीर आहेत.

 अभ्यासाची वेळापत्रक करण्याचे त्याचे प्रयत्न, कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याच्या उठाठेवी, काही अंगलट आलेले प्रयत्न, होस्टेल, वेताळ टेकडी आणि टेकडी वरील यांच्या भटकन्त्य, सिगारेट,चहा, कॉलेजच्या  मुली, पुण्यातले नमुने मित्र आणि विद्वान प्रोफेसर लोक इत्यादिमुळे पुस्तक कधी अर्धे संपते ते काळात पण नाही. काही प्रसंग खूप मजेशीर आहेत पण खूप काही सांगून जातात. माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे पांडुरंग आणि सुरेश यांच्या मधील बोलणे. प्रत्येक गोष्टीची व्याख्या करताना त्यांनी  विडंबन मस्त केले आहे.

पुस्तकाच्या कल्पना आणि मांडणीला तोड नाही. पुस्तकाच्या शेवटचा काही भाग मात्र अनावश्यक आणि थोडा कंटाळवाणा वाटतो. पुस्तकाच्या शेवटाबद्दल मात्र मला काहीच तक्रार नाही. एकूणच आजही  पुण्यात शिकायला येणाऱ्या प्रत्येकाने कोसला वाचलेच पाहिजे .